सेक्स चॅटच्या मोहापायी गुप्त माहिती आयएसआयला दिल्यामुळे हवाई दलातील कॅप्टनला अटक

सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून दोन पाकिस्तानी तरुणींच्या संपर्कात

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांनी गुरुवारी ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह (५१) यांना अटक केली आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयला ला भारतीय हवाई दलाची गुप्त माहिती पोहोचवल्याच्या आरोपाखाली त्याला अटक केले. हवाई दलाच्या मुख्यालयातून त्याच्या मोबाइलवर महत्वाच्या कागदपत्रांचे फोटो काढून ते व्हॉट्सअॅपवरुन आयएसआयला पाठवायचा अशी माहिती स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोद कुशवाहा यांनी दिली.

भारतातील सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांना हॅनी ट्रॅपमध्ये अडकवून गोपनीय माहिती मिळवण्याचे कारस्थान पाकिस्तानकडून रचण्यात आले. हवाई दलात ग्रुप कॅप्टन पदावर कार्यरत असलेला अरुण हा डिसेंबरमध्ये सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून दोन तरुणींच्या संपर्कात आला. त्या तरुणींनी मॉडेल असल्याचे भासवत अरुणशी संपर्क वाढवला. काही दिवसांनी त्या तरुणींनी अरुणशी अश्लील भाषेत संवाद साधायला सुरुवात केली. अरुण त्यांच्या जाळ्यात अडकताच अरुणकडून गोपनीय माहिती मागवण्यात आली. अरुणशी ज्या प्रोफाईलवरुन संपर्क साधण्यात आला ते प्रोफाईल फेक असल्याचा संशय आहे. आयएसआयच्या अधिकाऱ्यांनीच हे प्रोफाईल सुरु केले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

You might also like
Comments
Loading...