ड्रग्जशिवाय कॉमेडी होऊ शकत नाही का ? राजू श्रीवास्तव यांचा परखड सवाल

raju shrivastav

मुंबई : गेल्या 2 आठवड्यांपासून एनसीबीने मुंबईतल्या अंधेरी, वर्सोवा, घाटकोपर या भागात धाड सत्र सुरू केले आहे. यामध्ये बॉलिवूडशी संबंधित अनेकांची नावे समोर आल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले आहेत. आता ड्रग प्रकरणात प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह हिच्या अटकेनअतंर आता तिचा पती हर्ष लिंबाचिया याला देखील एनसीबीने (NCB) अटक केली आहे.

शनिवारी भारतीला अटक करण्यात आली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून हर्ष लिंबाचिया याची जवळपास 18 तास चौकशी झाल्याची माहिती समोर येत आहे. एनसीबी अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. एनसीबीने केलेल्या चौकशीमध्ये दोघांनीही अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे कबुल केले आहे.

भारती सिंहचे ड्रग्स प्रकरणात नाव आले म्हणून तिला अटक केल्याबद्दल कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. श्रीवास्तव म्हणाले, ‘हे सर्व घेण्याची काय गरज आहे. ड्रग्जशिवाय कॉमेडी होऊ शकत नाही का? भारती सोबत मी खूप काम केले आहे. मी तिच्या लग्नात गेलो होतो, लोक रात्रभर नाचत होते, कॉमेडी करत होते. मला ते तेव्हा लक्षात आले नाही की हे लोक इतके कॉमेडी कसे करतात, रात्रभर डान्स कसे करतात. मला असे वाटले की आपण लग्नाच्या आनंदाच्या भावनेत रात्रभर नाचत असतील, एनर्जी येत असेल. पण आता लक्षात येतंय त्याचं कारण.

महत्वाच्या बातम्या