मॅगीशिवाय नाईट शिफ्टचे शूट करु शकत नाही; स्वराचा तो व्हिडिओ व्हायरल

swar

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. सोशल मीडियावर स्वरा मोकळेपणाने तिचं मत मांडताना दिसते. नुकताच स्वराने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

स्वरा भास्करने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ  शेअर केला आहे. या व्हिडीओत ती रात्री अंधारात लपून मॅगी खात आहे. या मागच कारण सांगत स्वरा म्हणाली, ‘तिची दोन मुलांच्या आईची भूमिका साकारते आणि आता ती मॅगी खात आहे. यावेळी तिने हे ही कबूल केले आहे की ती मॅगीशिवाय नाईट शिफ्टचे शूट करु शकत नाही. तर निर्मात्यांनी तर तिला पाहिलं नाही ना असे देखील ती यावेळी बोलते.’

हा व्हिडीओ शेअर करत  मला काही वाटतं नाही. माझे ट्रेनर आणि न्यूट्रिशनिस्ट किंवा निर्मात्यांना आणि स्टायलिस्टला कोणीही सांगू नका,’असे कॅप्शन स्वराने दिले आहे. दरम्यान स्वरा ‘शीर कोरमा’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसली होती. याच बरोबर तिने अनेक वेब सीरिजमध्ये आणि शॉर्ट फिल्म्समध्ये काम केले आहे. लवकरच ती ‘जाहां चार यार’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. स्वराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या