नाशिक जिल्ह्यात 122 जागांसाठी 2,967 जणांचे ऑनलाईन अर्ज

नाशिक: नाशिक जिल्ह्यात इछुक उमेदवारांनी विक्रमी आकडेवारीने उमेदवारी अर्ज भरले आहेत. नाशिकमध्ये महापालिकेच्या एकूण १२२ जागा आहेत. या जागांसाठी नाशिकमध्ये तब्बल तब्बल २ हजार ९६७ इच्छुकांनी ऑनलाईन उमेदवारी अर्ज नोंदणी केले आहेत. तर ४२० जणांनी आपले उमेदवारी अर्ज प्रत्यक्ष निवडणूक आयोगाकडे दाखल केले आहेत.

नाशिकमध्ये निवडणुकीसाठी उमेदवारी भरण्याची ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी मानली जात आहे..

ऑनलाईन अर्ज – 2,967

प्रत्यक्ष अर्ज – 420

उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. अवघे काही तास शिल्लक असतानाही मनसे वगळता एकाही राजकीय पक्षाने आपली उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. इच्छुकांनी पक्षांच्या भरवशावर न राहता आपली तयारी सुरु केल्याचं दिसतं आहे.