fbpx

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा औरंगाबादचा उमेदवार ठरला

मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा खासदार नारायण राणेंनी आधीच केली होती. आधी सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघातून चिरंजीव नीलेश राणे यांची उमेदवारीची घोषणा करणाऱ्या राणेंनी आता औरंगाबादचा उमेदवार जाहीर केला आहे.

भाजपविरोधात उमेदवार देणार नाही, असे याआधीच जाहीर केले आहे. मात्र, शिवसेनेविरोधात आपले उमेदवार असतील असे स्पष्ट केले होते. औरंगाबादमधून सुभाष किसनराव पाटील हे स्वाभिमान पक्षाकडून लोकसभा लढवतील, राणे यांनी असे जाहीर केले आहे.

राज्यात किमान पाच जागा लढवणार असल्याची घोषणा राणे यांनी केली आहे. स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराला मत म्हणजे मोदींना मत असे समजायला हरकत नाही, असेही राणे म्हणाले.