नियोजित कार्यक्रम रद्द करत पवारही दिल्लीकडे रवाना; राजकीय हालचालींना वेग!

नियोजित कार्यक्रम रद्द करत पवारही दिल्लीकडे रवाना; राजकीय हालचालींना वेग!

शरद पवार

मुंबई : राज्यात महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. यासाठी सगळेच पक्ष आपला झेंडा फडकवण्यासाठी कंबर कसत आहे. या अनुषंगाने आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) दिल्लीत दाखल झाले आहेत.

भाजप मुख्यालयात गेल्या तासाभरापासून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासोबत वरिष्ठांची बैठक सुरु आहे. काल चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची (Amit Shah) यांची भेट घेतली. त्यानंतर आता पक्ष कार्यालयामध्ये खलबतं सुरु आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार दिल्लीत दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवार मुंबईतील सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करुन दिल्लीला गेल्याचं समजत आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दिल्ली दौऱ्यात शरद पवार केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग (Rajnath Singh) यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच आजच्या विरोधकांच्या बैठकीमध्ये शरद पवार सहभाग होणार असल्याचे देखील म्हंटले जात आहे. परंतु याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या: