मोदींचा एखादा दौरा रद्द करुन हवामान विभागाला चांगला सॅटेलाईट घ्या : राजू शेट्टी

टीम महाराष्ट्र देशा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी नुकत्याच झालेल्या शेतकरी आंदोलनातून शेतकऱ्यांंच्या दुधाला भाव मिळवून दिलाय आणि आता ते पुन्हा एकदा शेतकऱ्यांंच्या प्रश्नावरून हवामान खात आणि केंद्र सरकार ची शाळा घेताना दिसले. हवामान विभागापेक्षा ज्योतिषांकडे जाऊ का? चुकलेल्या पावसाच्या अंदाजामुळे राजू शेट्टींनी संताप व्यक्त केला आणि मोदींचा एखादा दौरा रद्द करुन हवामान विभागाला चांगला सॅटेलाईट घ्या, असा सल्ला देखील यावेळी त्यांनी सरकारला दिला.

यावर्षी चांंगला पाऊस पडेल अस भाकीत हवामान खात्यान वर्तवल होत. मात्र जुलै महिना उलटला तरी देखील अजून पावसाचा तपास नाही आणि राज्यातील शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आल आहे. तरी देखील अजून पाऊस पडत नसल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाल्याच चित्र स्पष्ट आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड

गव्हाणी आणि दावणी अजून घट्ट केल्याबद्दल राजू शेट्टींच अभिनंदन