Breaking: सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द, शेख हसीना यांची ऐतिहासिक घोषणा

bangladesh-ends-reservation

टीम महाराष्ट्र देशा- बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात सध्या मोठ्याप्रमाणावर नाराजी वाढली असून या पार्श्वभूमीवर बुधवारी पंतप्रधान शेख हसीना  यांनी ऐतिहासिक अशी घोषणा केली. बांगलादेशमध्ये यापुढे सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्यात आलं आहे.

बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात सध्या मोठ्याप्रमाणावर आवाज उठवला जात होता.सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करा या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आणि बेरोजगारांचा समावेश असलेले 10 हजार आंदोलक ढाका शहरात ठिय्या मांडून बसले होते. अखेर या आंदोलनापुढे नमते घेत पंतप्रधान शेख हसीना यांनी आरक्षण रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

बांगलादेशच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ 2 टक्के असलेल्या लोकांना 56 टक्के आरक्षण दिले जाते. उर्वरित 98 टक्के लोकांसाठी फक्त 44 टक्के संधी उपलब्ध असण्यावर आंदोलकांचा आक्षेप होता. सरकारी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांना केवळ एकदाच आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी मागणी आंदोलकांनी केली होती.या आंदोलनाच्यानिमित्ताने बांगलादेशमध्ये अनेक दशकांनी इतक्या मोठ्याप्रमाणात जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. त्यामुळे ढाका शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. या आंदोलनामुळे देशातील वातावरण प्रचंड तापल्यानंतर अखेर पंतप्रधान शेख हसीना यांनी संसदेत आरक्षण पद्धती रद्द करत असल्याची ऐतिहासिक घोषणा केली.