UY कंपनीचा परवाना रद्द करुन उच्चस्तरीय चौकशी करा – नवाब मलिक

plan crash mumbai

मुंबई  – घाटकोपरमध्ये काल झालेल्या विमान दुर्घटनेनंतर UY कंपनीचा परवाना रद्द करुन उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मिडियाशी बोलताना केली.

घाटकोपरमध्ये UY कंपनीचे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. या कंपनीचा अनुभव फक्त चार वर्षाचा आहे. या कंपनीने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी विमानसेवा देण्याचा ठेका दिला होता. त्यानंतर दोनदा मुख्यमंत्री विमान अपघातातून वाचले. नंतर याच कंपनीचे विमान काल कोसळले आहे.

उत्तरप्रदेशचे भंगार खरेदी करुन एखादी विमानसेवा कोण चालवत असेल तर हा विषय गंभीर आहे. या अगोदरच्या अपघाताची चौकशी का झाली नाही असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

2 Comments

Click here to post a comment
Loading...