रेस्टॉरंट, हॉटेलचे लॉकडाऊन रद्द करा! एचआरडब्ल्यूआयची मागणी

औरंगाबाद : राज्य सरकारने कोरोनाच्या नियंत्रणासाठी कठोर निर्बंध लागू करताना हॉटेल आणि रेस्टॉरंटवर संपूर्ण लॉकडाऊन लावला आहे यामुळे राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादमधील हॉटेल आणि रेस्टॉरंट मालक मोठ्या संकटात सापडले आहेत. एचआरडब्ल्यूआयने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती राज्य सरकारकडे केली आहे.

औरंगाबाद शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांचे म्हणले आहे की, मागील आठ महिन्यांच्या लॉकडाऊननंतर पुन्हा अशा प्रकारची घोषणा केल्यामुळे व्यवसाय मृत्यूपंथाला टेकेल. हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया (एचआरएडब्ल्यूआय) आणि औरंगाबाद हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने इशारा दिला आहे की, याघडीला पूर्ण लॉकडाऊन केल्यामुळे उद्योगाचे भरुन न येणारे नुकसान होईल.

हा व्यवसाय पूर्णपणे कोलमडून जाण्यापासून रोखायचा असेल तर सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. तसेच रेस्टॉरंट्सला नियमित वेळेप्रमाणे व्यवहार करु द्यावेत आणि गरज असेल तर त्यातील संख्येवर निर्बंध आणावेत, अशी विनंती एचआरएडब्ल्यूआयने केली आहे. कोविड रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे हे नाकारता येणार नाही.

मात्र त्यासाठी केवळ आदरातिथ्य उद्योगाला जबाबदार धरणे हे पूर्णपणे अयोग्य आहे. कोरोनापासून बचावासाठी हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये सर्वप्रकारची खबरदारी पूर्णपणे घेतली जाते. आम्ही सरकारला विश्वास देऊ इच्छितो की, आम्ही एक जबाबदार उद्योग आहोत आणि त्यामुळे हॉटेल व रेस्टॉरंटला व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, असे एचआरएडब्ल्यूआयचे अध्यक्ष शेरी भाटिया यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या