आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत ‘मेगा भरती रद्द करा’

Maratha Karnti Morcha

टीम महाराष्ट्र देशा : जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोवर मेगा भरती रद्द करा अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. गेल्या सहा दिवसांपासून परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन सुरुच आहे. जोवर ठोस मागणी मान्य होत नाही तोवर इथला ठिय्या मागे घेणार नाही. अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली आहे.

दरम्यान ,मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा मोर्चेकऱ्यांनी मराठवाड्यात ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन दिलं. बीड जिल्ह्यातील परळीत 18 जुलैपासून या ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर जागेवरुन हलणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महापूजा करु देणार नाही, असा इशारा देखील मराठा क्रांती मोर्चाने त्यावेळी दिला होता.

१५ डिसेंबरनंतर राज्यातील रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही- चंद्रकांत पाटील

 

‘सावजाची शिकार मीच करीन’ – उद्धव ठाकरे