भारतीय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवरील जीएसटी रद्द करा – आर्य संगीत प्रसारक

sawai-gandharva-mahotsav-organizers-demand-exemption-from-gst

पुणे : केंद्र सरकारने अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवर लावलेल्या २८ टक्के जीएसटीमुळे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांच्या तिकीटांच्या किमती वाढत असून त्यामुळे श्रोत्यांची संख्या रोडावेल आणि याचा शास्त्रीय संगीताच्या प्रचार व प्रसारावर नकारात्मक परिणाम होईल, त्यामुळे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवरील जीएसटी रद्द करावा, अशी मागणी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी केली.

केंद्र सरकारने शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचा ‘लग्झुरियस सेगमेंट’मध्ये समावेश करत २५० रुपयांहून अधिक तिकीट असणा-या कार्यक्रमांच्या तिकिटावर २८ टक्के जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे श्रोत्यांना वाढीव तिकिटाचा भार सहन करावा लागत आहे. अशा पद्धतीने तिकीटांची किंमत वाढली तर श्रोत्यांच्या संख्येवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊन शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांचा श्रोतावर्ग कमी होईल. तसेच तिकिट कमी ठेवले तर आजच्या काळात कार्यक्रमाच्या खर्चाचा ताळेबंद बांधणे आयोजकांना शक्य होणार नाही. अशा पद्धतीने दुहेरी कोंडीत आयोजक आणि प्रेक्षक सापडले असून शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना लग्झुरियस सेगमेंटमध्ये न टाकता त्यांवरील जीएसटी रद्द करावा, अशी मागणी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

Loading...

श्रीनिवास जोशी म्हणाले, शास्त्रीय संगीताला बॉलिवुड किंवा क्रिकेटसारखे आर्थिक पाठबळ नसते. जीएसटीमुळे तिकिटदर वाढल्याचा बोजा रसिकांवर पडतो. जीएसटी माफ करण्याबाबतचे निवेदन आम्ही प्रथम अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले होते. त्यांनी त्याची दखल घेत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आम्ही ई-मेलद्वारे बुजुर्ग गायकांना हा विषय सांगितला. ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे, ज्येष्ठ संतूर वादक शिवकुमार शर्मा, ज्येष्ठ बासरीवादक हरीप्रसाद चौरसिया, ज्येष्ठ गायिका बेगम परवीन सुलताना, ज्येष्ठ ध्रुपद गायक बंधू पं. राजन व पं. साजन मिश्रा, प्रसिद्ध सतारवादक नीलाद्रीकुमार, ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर, प्रसिद्ध व्हायोलिन वादक डॉ. एल. सुब्रह्मण्यम यांनी आमच्या मागणीस पाठिंबा दिला आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांच्या पुढाकाराने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडेही निवेदन देण्यात आले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
मी शरद पवारांसोबत जाणारचं... रामदास आठवले म्हणतात
आता इंदोरीकर महाराजांच्या कार्यक्रमाला युवासेनेच्या वाघांचे संरक्षण....