पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचा जीएसटी रद्द करावा : शिवसेना

टीम महाराष्ट्र देशा :  गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरात करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतीमालाची मोठी हानी झाली आहे. मोठ्या प्रमाणात पशुधनाचेही नुकसान झाले आहे.

या महापुरावरून शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्थानिक व्यापाऱ्यांचे या पुरात अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचा जीएसटी रद्द करावा. अशी मागणी केली आहे. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार पूरग्रस्त बांधवांसाठी मदत करत आहे. याशिवाय सामाजिक संस्था, शिवसेना मदत निधी, खासगी अनुदान अशा विविध माध्यमातून राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. याचवेळी पूरग्रस्त व्यापाऱ्यांनाही सरकारी मदतीची गरज आहे. त्यांना जीएसटी माफ केल्यास मोठा दिलासा मिळू शकेल असं विधान केले आहे.

Loading...

तसेच राहुल शेवाळे यांनी त्यांच्या खासदार निधीतून पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत केली आहे . त्याचबरोबर तसेच गेल्या आठवड्यात हजारो बिस्कीटचे पुडे आणि पाण्याच्या बाटल्याही राहुल शेवाळे यांनी ‘श्री राधा फाऊंडेशन’च्या माध्यमातून पूरग्रस्त भागात देण्यात आल्या आहेत तसेच शी सैनिकही पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करत आहेत.

दरम्यान, राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना १५४ कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून देण्यात येणार आहे. हा निधी मृत व्यक्तींचे परिवार, जखमी तसेच पूरग्रस्तांना देण्यात येणार असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे या बाधित नागरिकांना सरकारच्या आर्थिक मदतीमुळे झालेलं नुकसान भरून काढण्यास मदत होणार आहे त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'