‘काँग्रेस आ.रणजित कांबळेंची आमदारकी रद्द करा’, राज्यपालांना निवेदन

बीड : वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आमदार रणजित कांबळे यांनी शिवीगाळ केली होती. या प्रकरणात आमदारांवर गुन्हा नोंद झाला. पण शासकीय कामात अडथळा आणण्यासह इतर कलमे लावली नाहीत असा आरोप करून काँग्रेसचे आमदार कांबळेंचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत बीड जिल्हा आरोग्य अधिकारी संघटनेने राज्यपाल व विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. आर. बी. पवार यांनी दिली.

वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डवलेंना आमदार कांबळे यांनी अँटिजन तपासणी शिबिरावरून फोनवर शिवीगाळ केली होती. याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी संघटनेने काम बंदचा इशारा दिला होता. मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. दुसरीकडे, या प्रकरणात आमदार कांबळेवर गुन्हा नोंद झाला.

पण यात शासकीय कामात अडथळा आणणे या कलमाअंतर्गत गुन्हा पोलिसांनी नोंदवला नाही. त्यामुळे संघटनेने अधिक आक्रमक होत कलमे वाढवावीत आणि कांबळे यांची आमदारकी रद्द करावी, यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवले आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP