बबनराव लोणीकरांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसची मागणी

टीम महाराष्ट्र देशा- जालना जिल्ह्यातल्या परतूर विधानसभा मतदारसंघातले भाजप उमेदवार बबनराव लोणीकर यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दखल करून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रत्नाकर महाजन यांनी केली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी लोणीकर हे भ्रष्ट मार्गाचा अवलंब करत असल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे.

बबनराव लोणीकर यांनी प्रचारसभेत भाषण करताना ‘आपण सर्व तांड्यांवर पैसे वाटलेले असल्याने आपल्याला निवडून येण्याची चिंता नाही’, असे वक्तव्य केलेले असून मते मिळवण्यासाठी ते विशिष्ट जातीचा उल्लेख करत आहेत. यावरून निवडणूक जिंकण्यासाठी ते भ्रष्ट मार्गांचा अवलंब करत आहेत, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे बबनराव लोणीकर यांच्याविरूद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दखल करून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना पत्र लिहून केली आहे.

लोणीकर यांनी प्रचारसभेत भाषण करताना “आपण सर्व तांड्यांवर पैसे वाटलेले असल्याने आपल्याला निवडून येण्याची चिंता नाही” असे वक्तव्य केले आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लोणीकरांची उमेदवारी रद्द करण्यात यावी. अशी मागणी महाजन यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...