आता पंढरपुरही होणार ‘स्मार्ट’!

वेबटीम : कॅनडा व भारत सरकारच्या मैत्रीला आज तब्बल दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने कॅनडा सरकारकडून भारताला एक मोठ गिफ्ट मिळाल आहे. कॅनडा सरकारकडून भारतातलं एक शहर विकसित करायचं होतं आणि आता या यादीत पंढरपूर चा नंबर लागला आहे.

पंढरपुर च्या विकासासाठी कॅनडा सरकारकडुन दोन हजार कोटी रूपयांची गुंतवणुक करण्यात येणार आहे. भारत आणि कॅनडाच्या मैत्रीला दीडशे वर्ष पूर्ण झाले त्यामुळे हा निर्णय कॅनडा सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. काल कॅनडा सरकारचे प्रतिनिधी, मंदीर समितीचे प्रतिनिधी व राज्य सरकारच्या शिष्ठमंडळ यांच्यात पंढरपुर येथे बैठक पार पडली आणि या बैठकीत पंढरपुरच्या विकासाला प्रधान्य देण्यात आले आहे.

पंढरपुरच्या विकासाला दोन हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे. यासंदर्भात परत 3 ऑक्टोबर रोजी अजुन एक महत्वपूर्ण बैठक पार होणार आहे ज्यामधे कॅनडा सरकारचे महत्वाचे प्रतिनिधी उपस्तित राहनार आहेत.