नवे शैक्षणिक वर्ष ऑक्टोबरपासून सुरू होऊ शकते?

students

नवी दिल्ली : जगात कोरोनाने रुग्ण वाढत आहे. तर देशात देखील आता कोरोनाची संख्या वाढत आहे. याचा खूप मोठा परिणाम नवे शैक्षणिक वर्ष आणि परीक्षांनवर होताना दिसत आहे.करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षा शासनाने ऐच्छिक केल्या असताना आता विद्यापीठ अनुदान आयोग अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याबाबत चाचपणी करत आहे. त्याचप्रमाणे नवे शैक्षणिक वर्ष ऑगस्टऐवजी ऑक्टोबपर्यंत पुढे ढकलण्याचाही प्रस्ताव आयोगासमोर आहे.

देशभरात एकच सूत्र लागू करण्याबरोबरच नवे शैक्षणिक वर्षही उशिरा सुरू करण्याचाही प्रस्ताव आयोगासमोर आहे. यापूर्वी आयोगाने जाहीर केलेल्या आराखडय़ात प्रथम वर्ष वगळता इतर वर्षांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष ऑगस्टमध्ये, तर नव्याने प्रवेश घेणाऱ्या म्हणजे प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सप्टेंबरमध्ये सुरू करण्याची शिफारस केली होती. आता शैक्षणिक वर्ष ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा आणि नव्या शैक्षणिक वर्षांबाबत निर्णय घेण्यासाठी समिती नेमली आहे. सध्याचा परिस्थितीत जुलैमध्ये परीक्षा घेणे शक्य नसल्याचे सांगून पुढील सूचनांची विचारणा आयोगाकडे केली. या पार्श्वभूमीवर आता आयोग यापूर्वी जाहीर केलेल्या आराखडय़ामध्ये बदल करण्याची शक्यता आहे.

आयोगाने नेमलेल्या समितीने अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करून आधीच्या वर्षांतील कामगिरी आणि अंतर्गत गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याची शिफारस केल्याचे समजते आहे. ज्या विद्यार्थ्यांना सरासरी मूल्यांकनानुसार देण्यात आलेले गुण मान्य नसतील त्यांच्यासाठी परिस्थिती निवळल्यावर परीक्षा घेण्यात यावी, असेही या समितीने सांगितले आहे.

करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आसल्यामुळे आयसीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही, अशी भूमिका राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयात स्पष्ट केली. तर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी या प्रकरणी सुनावणी होणार असून त्यावेळीच परीक्षा घ्यायच्या की नाहीत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे केंद्र सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.

ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या परीक्षांच्या बाबतीत पवारांनी केलेला दावा खोटा ?

अंतिम वर्षाच्या परीक्षांचा घोळ संपवा, देवेंद्र फडणवीसांची आक्रमक मागणी

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी?