fbpx

आज भारत घेणार विजयी आघाडी?

भारत विरुद्ध विंडीज सामना आज अँटिग्वा येथे होणार असून भारत २-० असा मालिकेत आघाडीवर आहे. पहिला सामना पाऊसामुळे वाया गेल्यानंतर पुढील दोनही सामन्यात भारताने सफाईदार विजय मिळवले आहेत.

५ सामान्यांच्या मालिकेतील हा ४था सामना जिंकून भारत विजयी आघाडी घेण्यासाठी नक्कीच उत्सुक असणार आहे. या सामन्यात काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचे संकेत भारतीय कर्णधार विराट कोहलीने दिले आहेत.

दिनेश कार्तिक आणि महंमद शमी यांना चॅम्पियन्स ट्रॉफीपासून एकही सामना खेळायला मिळालेला नाही. तर आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट गाजवणारा यष्टीरक्षक रिषभ पंतच्या नशिबात अजूनही एकदिवसीय सामन्यांची जर्सी काही आलेली नाही. सध्या विंडीज संघ हा अतिशय खराब कामगिरी करत असल्याने मुख्य खेळाडूंना विश्रांती देऊन भारताच्या या दुसऱ्या फळीला संधी देण्यात येणार असल्याचेही विराटने सांगितले.

सध्या एक युवराज सिंग सोडला तर अन्य खेळाडू बऱ्यापैकी कामगिरी करत आहे. त्यामुळे या दिग्गज खेळाडूला ४थ्या सामन्यात बसवून दुसऱ्या फळीतील एखाद्या फलंदाजाला संधी मिळायची दाट शक्यता आहे.

हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६:३० वाजल्यापासून अँटिग्वा येथे सुरु होईल.

2 Comments

Click here to post a comment