भक्तांनी फसवले देवाला

दान मिळालेल्या 500 आणि 1 हजार च्या जुन्या नोटा बॅंकेत जमा करता येणार नाहीत - सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली – नोटबंदी नंतर जुन्या नोटा बालाजी चरणी अर्पण करून भक्तांनी देवाला फसवल्यानंतर सर्वात श्रीमंत मंदिर अशी ख्याती असलेल्या तिरुपती मंदिरात दान म्हणून दिलेल्या 500 आणि 1 हजार च्या जुन्या नोटा आता बॅंकेत जमा करता येणार नाहीत असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे . सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या निर्णयानुसार दानाच्या स्वरूपात मंदिरात आलेल्या तब्बल 8 कोटी 29 लाखांच्या 500 आणि 1 हजाराच्या नोटा बाद ठरल्या आहेत.

500 आणि 1 हजाराच्या नोटा रद्द करू नयेत त्या बॅंकेत भरण्याची परवानगी देण्यात यावी अशी याचिका आंध्र प्रदेशातले पत्रकार व्ही व्ही. रमणमूर्ती यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. या संबंधीचे निर्देश सुप्रीम कोर्टानं आरबीआयला द्यावेत असंही त्यांनी म्हटले होते. मात्र ही याचिका कोर्टाने आज फेटाळली आहे. त्यामुळे तब्बल 8 कोटी 29 लाखांच्या 500 आणि 1 हजाराच्या नोटा बाद ठरल्या आहेत.

विशेष म्हणजे तिरुपतीला नवस करताना भाविकांनी जुन्या नोटा दानपेटीत टाकल्या आहेत. त्या बॅंकेने स्वीकारल्या नाहीत तर भक्तांचे नवस पूर्ण होणार नाहीत म्हणून या नोटा बॅंकेत जमा करण्याची संमती मिळावी, असेही या याचिकेत नमूद करण्यात आले होते.कोणताच ठोस दावा याचिकाकर्त्याच्या याचिकेत नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.