बार्शी : राजेंद्र राऊत दिलीप सोपल यांना रोखण्यात यशस्वी होतील का ?

mla dilip sopal and rajendra raut cover image

बार्शी – विधानसभा निवडणूक आली की संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले असते ते म्हणजे बार्शी विधानसभा मतदारसंघावर.बार्शी विधानसभेचा १९६२ पासूनचा इतिहास पाहिला तर बार्शी विधानसभेवर फक्त एकदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे, तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा जास्त बोलबाला राहिलेला आहे.

आगामी विधानसभा निवडणूकीला जरी एक ते दीड वर्षे अवधी असला तरी सध्या तालुक्यात मोर्चेबांधणीला वेग आलेला आहे. ही निवडणूक पारंपारिक सोपल-राऊत गटात होणार हे जवळजवळ निश्चित आहे.बार्शीचा मागील इतिहास पाहिला तर प्रत्येक विधानसभेला निवडून येणारा उमेदवार हा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या चिन्हावर निवडून आलेला आहे.

१९७८ साली राज्यात जनता दलाची लाट होती त्यावेळी कॉंग्रेसचे कृष्णाराव देशमुख (३४८५९ मते) जनता दलाचे पन्नालाल सुराणा (२९०६७ मते) यांचा पराभव केला होता. आणि कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडणूक जिंकली.१९८० साली राज्यात व देशात इंदिरा कॉंग्रेसच्या राज्यातील लाटेत कॉंग्रेसचे बाबुराव नरके (३२४५५ मते) यांनी अर्जून बारबोले (३०१९५ मते) यांचा पराभव केला.
तर पुढे १९८५ साली कॉंग्रेसने एकत्र लढून त्यांचे सरकार राज्यात आले पण याच मतदारांनी कॉंग्रेसचे बाबुराव पाटील यांना पराभूत केले. त्यावेळी पहिल्यांदा निवडणूक लढविणारे दिलीप सोपल यांना (४२८२२मते) निवडून दिले. तर बाबुराव पाटील यांना (३२९६९ मते) पडली होती.

१९९० साली विद्यमान आमदार दिलीप सोपल कॉंग्रेस कडून उभे होते, त्यांनी अपक्ष उमेदवार माजी आमदार कृष्णाराव देशमुख (२५३५६मते) यांचा पराभव केला.त्यानंतर १९९५ साली राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले त्यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून दिलीप सोपल ( ४२५४५मते) यांनी कॉंग्रेसच्या प्रभावती झाडबुके (३७०६१ मते) यांचा पराभव करून आमदारकीची हॅॅट्रिक केली.

१९९९ साली युती विरूद्ध कौल जाऊन राज्यात पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून आमदार दिलीप सोपल (४७५२७ मते) यांनी प्रथमच निवडणूक लढविणारे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र राऊत (४७१८८ मते) यांचा पराभव केला. आणि दिलीप सोपल हे चौथ्यांदा विधानसभेवर सलग निवडून गेले.

२००४ मध्ये राज्यात पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी ची सत्ता आली परंतु तालुक्यातील राजकारणात मात्रट्विस्ट आला, कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आली राष्ट्रवादी कडून राष्ट्रवादीला गेली आणि राष्ट्रवादी कडून विद्यमान आमदार दिलीप सोपल उभे होते. १९९९ विधानसभेत निसटता पराभव झालेले राजेंद्र राऊत (७३४०१ मते)यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप सोपल (६८१८१ मते) यांचा पराभव केला. आणि राजेंद्र राऊत यांनी पहिल्यांदा आमदार होऊन बार्शी विधानसभेवर भगवा फडकवला.

२००९ विधानसभा निवडणूकीत मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि बार्शी विधानसभेत कुरघोड्या पहायला मिळाल्या शिवसेनेचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांनी शिवसेनेला रामराम ठोकत कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला यावेळी मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत राष्ट्रवादी कडे असलेली जागा कॉंग्रेस कडे गेली कॉंग्रेस कडून राजेंद्र राऊत यांनी निवडणूक लढविली तर राष्ट्रवादी कडून उमेदवारी न मिळाल्यामुळे माजी आमदार दिलीप सोपल (९०५२३ मते) यांनी अपक्ष निवडणूक लढवून विद्यमान आमदार राजेंद्र राऊत (८०३१३ मते) यांचा पराभव केला.
शिवसेनेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

२०१४ विधानसभा निवडणूक आली तेव्हा राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरोधी लाट होती. विधानसभा निवडणूकीच्या १ वर्षे अगोदर माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी कॉंग्रेसची साथ सोडत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.आणि उमेदवारी मिळविली. राज्यात शिवसेना-भाजप यांची युती तुटली तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी ने आपली आघाडी तोडून स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला.

२०१४ विधानसभा निवडणूकीत निर्णय घेतला. शिवसेना कडून राजेंद्र राऊत, राष्ट्रवादी कडून विद्यमान आमदार दिलीप सोपल तर भाजप कडून प्रथमच निवडणूक लढविणारे राजेंद्र मिरगणे उमेदवार होते. या निवडणूकीत राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप सोपल (९७६५५ मते) यांनी शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र राऊत (९२५४४ मते) पुन्हा एकदा पराभव करून सहाव्यांदा विधानसभेवर जाण्याचा विक्रम केला. शिवसेनेचे राजेंद्र राऊत आणि भाजपचे राजेंद्र मिरगणे यांची मत विभागणी झाली राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरोधी लाट असूनही आमदार दिलीप सोपल यांनी आपला गड कायम राखला.

सध्याची बार्शीच्या राजकारणातील स्थिती पाहिली तरतर गेल्या चार वर्षात अनेक बदल घडून आले शिवसेनेचे माजी आमदार यांनी शिवसेना सोडली आणि भाजप मध्ये प्रवेश केला.
२०१९ मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा चुरस पहायला मिळणार आहे कारण शिवसेनेने आगामी काळात कुठल्याही प्रकारची युती करणार नसल्याचे सांगितले आहे तर शिवसेनेकडून अजून पर्यंत कोण निवडणूक लढविणार हे स्पष्ट झालेले नाही तर भाजप मध्ये गेलेले माजी आमदार राजेंद्र राऊत आणि भाजपचे राजेंद्र मिरगणे यांच्यापैकी कोण्या एकाला उमेदवारी मिळणार हे गुलदस्त्यात आहे तसेच भाजप मध्ये बंडखोरी होणार हे जवळजवळ निश्चित आहे.तर विद्यमान आमदार दिलीप सोपल राष्ट्रवादी कडून सातव्यांदा निवडून येऊन इतिहास करणार का हे येणाऱ्या काही काळातच समजेल.

बार्शी विधानसभेचे अॉडिट केले तर प्रत्येक निवडणूकीत निवडून येणारा उमेदवार हा वेगवेगळ्या चिन्हावर निवडून आलेला आहे.त्यामुळे २०१९ ला आमदार दिलीप सोपल राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून येऊन इतिहास पुसणार की माजी आमदार राजेंद्र राऊत दिलीप सोपलांना रोखून नविन चिन्हावर निवडून येणार हे आगामी विधानसभेनंतरच समजेल.