सिरम इन्स्टिट्यूट तर्फे ‘कॅम्पस प्लेसमेंट’

औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलच्यावतीने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीसाठी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन सोमवारी (दि.२२) करण्यात आले.

या कॅम्पस इंटरव्ह्यू साठी एम.एस्सी.मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री आणि बायोटेक्नॉलॉजी या विषयाचे १९० विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित विद्यापीठातील कोविड टेस्टिंग लॅबचे संचालक प्रा.जी.डी.खेडकर तसेच विज्ञान शाखेचे अधिष्ठाता प्रा.बी.बी.वायकर यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. तर सीरम इन्स्टिट्यूटचे एच.आर प्रतिनिधी भूषण आपटे व चिन्मय कुलकर्णी यांनी निवड प्रक्रिया समजावून सांगितली. १९० पैकी ८० विद्याथ्र्यांची प्राथमिक निवड करण्यात आली.

या पैकी जे विद्यार्थी प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये पात्र ठरतील त्यांची सीरम इन्स्टिट्यूट मध्ये प्रोडक्शन विभागामध्ये ट्रेनी या पदावर नेमणूक केली जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या कोविड सारख्या पँडेमिक परिस्थिती मध्ये कोविड लस उत्पादन करणाNया विभागात नौकरीची संधी विद्यापीठातील विद्याथ्र्यांना उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठातील प्लेसमेंट सेलचे प्लेसमेंट ऑफिसर डॉ.गिरीश काळे यांनी परिश्रम घेतले.

महत्वाच्या बातम्या