सोनिया गांधी घेणार कर्नाटकमध्ये प्रचार सभा

सोनिया गांधी

बिजापूर – कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून, प्रचाराची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. आता काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी कर्नाटक विधानसभा निवडणुक प्रचाराच्या मैदानात उतरणार असून, त्या कर्नाटकमध्ये प्रचार सभा घेणार आहेत.

सोनिया गांधी जवळपास दोन वर्षांनी निवडणूक प्रचारसभेत सहभागी होणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर त्या आज बिजापूर येथे दुपारी चार वाजता प्रचारसभा घेणार आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी ही त्यांची पहिलीच प्रचारसभा असणार आहे.

कर्नाटकमध्ये आपली सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेस सर्वोपतरी प्रयत्न करत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी रोज प्रचारसभांसोबत दौरा करत लोकांशी संवाद साधत आहेत. सोमवारी राहुल गांधी यांच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली.