मनोहर पर्रिकरांच्या विरुद्ध तरुणींची मोहीम; हो आम्ही बिअर पितो!

manohar parilkar

टीम महाराष्ट्र देशा: हल्ली मुलीही खुलेआम मद्यपान करू लागल्याने मला भीती वाटू लागलीय, हे सहनशक्ती संपत चालल्याचं लक्षण आहे. माझं हे विधान अर्थातच सर्वांसाठी लागू आहे, असंही नाही पण महिलांनी दारू पीणं ही देखील नक्कीच चिंताजनक बाब आहे. अस मत माजी केंद्रीय संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केलं होत. त्यामुळे महिलांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. त्यांचा विरुद्ध एक मोहीमच सुरु केली आहे.

तरुणींनी मनोहर पर्रिकर यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच त्यांच्याविरोधात सोशल मीडियावर विशेष मोहिम सुरु करण्यात आली आहे. यामध्ये #GirlsWhoDrinkBeer या हॅशटॅगचा वापर करुन आपला बिअरसोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट करत आहेत. हो आम्ही बिअर पितो असे या मुलींनी सांगितले आहे. विशेष म्हणजे या अभियानात तरुणींबरोबरच अनेक महिलांनीही सहभाग घेतला आहे. ट्विटरवर या मुली पर्रिकर यांना टॅगही करत आहेत. इतकेच नाही तर अनेकींनी त्यात चिअर्स असेही लिहीले आहे. याशिवाय महिलांनो पिणे का थांबवावे? असा सवालही काहींनी व्यक्त केला आहे. पुरुषांनीही त्यांच्या या विधानाचा समाचार घेत आपला राग व्यक्त केला आहे.