गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला ‘बळी’ पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं ‘भलतंच’

टीम महाराष्ट्र देशा  :२०१३ साली गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहाला बळी पडलो. शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवणूक करण्याची खात्री मिळाल्याने मी भाजपसोबत सत्तेत  सहभागी झालो. मोदींवर विश्वास ठेवला, मात्र भलतंच घडलं, अजेंडे अन सांप्रदायिक विचार समोर ठेऊन भाजपने त्या कामांवरच भर दिला, त्यामुळे मी सत्तेला लाथ मारल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी नाशिक येथे सांगितले.

पुढे ते म्हणले शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळत नाही, हे पाप केंद्र सरकारचे आहे. १९९५ च्या जीवनावश्यक वस्तू अधिनियम कायदा थेट भुकेशी जोडला गेला. त्यामुळे बाजारपेठेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार सरकारला मिळाला.

Loading...

त्यामुळे मधले दलाल शेतकऱ्यांचे शोषण करत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्याची लूट होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी (ता.21) केला आहे.

शेट्टी म्हणाले, की शेतकऱ्यांना लुटणारे व्यापारी सावकार हे आहतेच, मात्र त्यापेक्षा मोठे लुटारू मुंबई व दिल्लीत आहेत. शेतकरी त्यांना बळी पडतात, हे शेतकऱ्याने समजून घेतले पाहिजे. तोडक-मोडका हमीभाव जाहीर होतो, तोही शेतकऱ्यांना मिळत नाही, असा घणाघात त्यांनी सरकारवर केला.

शेतकऱ्याच्या घामाच्या दामासाठी आता केंद्राच्या धोरणांची गरज आहे. त्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या स्वतंत्र लॉबीची गरज आहे. अर्थवादी भूमिकेतून काम उभे राहावे, नाहीतर तोपर्यंत फसवणूक होत राहणार, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

कार्यकर्त्यांनी चळवळीत काम करताना निराश होऊ नका, एकत्र होऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा, शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्ताधाऱ्यांशी दोन हात करू अन प्रश्न सोडवू, असे त्यांनी सांगितले.

तसेच राज्यात महाविकास आघाडीत कसे सहभागी झालात यावर शेट्टी म्हणाले की ‘दगडापेक्षा वीट मऊ’ या अर्थाने आम्ही आघाडीसोबत सहभागी झालो आहोत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका