डेटा सुरक्षेसंदर्भात आम्ही योग्य ते बदल केले; फेसबुकचे भारत सरकारला उत्तर

नवी दिल्ली – केंब्रिज अॅनालिटिका या ब्रिटिश कंपनीने अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फेसबुकवरील युजर्सचा डेटा चोरल्याचे समोर आले होते. या कंपनीने गैरमार्गाने ८.७ कोटी फेसबुक युजर्सची माहिती गोळा केली होती. यामुळे फेसबुकच्या अडचणी वाढल्या होत्या.

डेटा चोरीच्या प्रकरणामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आणि फेसबुकच्या विश्वासार्हतेला तडा गेला. केंद्र सरकारने मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फेसबुक आणि केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीला नोटीस बजावली होती. युजर्सची माहिती फुटू नये, यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा तपशील सरकारने मागितला होता. या नोटीसला उत्तर देण्यासाठी फेसबुकला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली.

दरम्यान फेसबुकवरील डेटा चोरीसंदर्भात केंद्र सरकारने पाठवलेल्या नोटीसवर अखेर अखेर फेसबुकने उत्तर दिले आहे. फेसबुकने नेमक्या काय उपाययोजना राबवल्या आहेत, याचा तपशील समजू शकलेला नाही. पण ‘आम्ही युजर्सचा डेटा सुरक्षित राहावा, यासाठी अनेक बदल केले आहेत’, असे फेसबुकने ईमेलमध्ये म्हटल्याचे वृत्त आहे.

You might also like
Comments
Loading...