स्वत: ला ब्राह्मण म्हणणं रैनाला पडलं महागात ; सोशल मीडियावर होतेयं जोरदार टीका

raina

मुंबई : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आता एका नव्या वादात अडकला आहे. सोशल मीडियावर त्याने केलेलं एक व्यक्त्यव्य त्याला महागात पडल्याचे दिसून येत आहे. त्याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

नुकतेच  रैनाला तामिळनाडू प्रीमियर लीगच्या (टीएनपीएल) पाचव्या मोसमातील सामन्यात समालोचन करण्यासाठी आमंत्रित केले गेले होते. या दरम्यान त्याला एक प्रश्न विचारला गेला होता.त्या प्रश्नाला उत्तर देताना रैनाने स्वत: ला ब्राह्मण म्हटले. त्याच्या याच वक्तव्यामुळे सोशल मीडियावर राग व्यक्त केला जात आहे.

या सामन्यात त्याला एका समालोचकाने प्रश्न विचारला की, त्याने दक्षिण भारतीय संस्कृती कशी स्वीकारली आहे. याच प्रश्नाला उत्तर देत रैना म्हणाला, ”मला वाटते, मी देखील ब्राह्मण आहे. मी २००४ पासून चेन्नईत खेळत आहे. मला इथली संस्कृती आवडते. तसेच मला माझ्या सहकारी आवडतात. मला चेन्नईची संस्कृती आवडते. मी भाग्यवान आहे की मी सीएसकेचा भाग आहे.’ रैनाने आपल्या उत्तरात ब्राह्मण असा उल्लेख केल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP