fbpx

युतीबाबत शिवसेनेची खलबत, शिवसेनेच्या सर्व खासदारांना मातोश्रीवर बोलावणे

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या शिवसेनेच्या सर्व खासदारांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता  मातोश्रीवर ही बैठक पार पडणार आहे.

शिवसेना भाजप युतीबाबत अजूनही अनिश्चितता असताना शिवसेनेने सर्व खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि विरोधकांची झालेली एकी यामुळे शिवसेनेची ही बैठक महत्वपूर्ण ठरणार आहे.

याआधी शिवसेनेच्या सर्व खासदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. भाजप बरोबर युती करावी असा शिवसेनेच्या  खासदारांचा आग्रह होता. पण उद्धव ठाकरे यांनी खासदारांना जमत नसेल तर लोकसभेची निवडणूक लढऊ नका असा तिखट सल्ला दिला होता.त्यानंतर आतापर्यंत अद्याप युती बाबत कोणतीच चिन्हे दोन्ही पक्षांकडून दिसत नसल्याने उद्याची होणारी बैठक नेमकी कशा संदर्भात असणार आहे यावर सर्वांचे लक्ष असणार आहे.