मनपा अधिकाऱ्यांना ‘फोन करो’ आंदोलन

औरंगाबाद : उन्हाळ्याच्या तोंडावर शहरात तीव्र पाणी टंचाई सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात आठ दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. नागरिकांना कुठलीही पूर्वकल्पना न देता पाण्याच्या वेळा आणि दिवस बदलले जात असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. मनपा अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी वॉर्डातील सर्व नागरिकांनी त्यांना फोन करत आंदोलन केले.

वॉर्ड क्रमांक ९ येथील मयुर नगर, सुदर्शन नगर मधील नागरिकांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना फोन करो आंदोलन केले. आपले हक्काचे पाणी वेळेवर सोडण्यासाठी यावेळी विचारणा करण्यात आली. गेले अनेक दिवस पाईपलाईन फुटल्यामुळे सोबतच अनेक कारणामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.

५ -६ दिवसाआड येणारे पाणी १० दिवस उलटले तरीही न आल्यामुळे संतप्त नागरिकांनी मनपा मुख्यालयात आंदोलनाचा प्रयत्न केला. मात्र त्यांना परवानगी मिळाली नाही. त्यावेळी रमेश इधाटे यांच्या सूचनेनुसार सर्व नागरिकांनी फोन करो आंदोलन केले. लवकरात लवकर पाणीपुरवठा केला नाही तर आंदोलनाचा इशारा नागरिकांनी यावेळी दिला.

महत्त्वाच्या बातम्या