कोलकाता पोलीस आयुक्तांना पश्चाताप होईल अशी कारवाई करू- सर्वोच्च न्यायालय

टीम महाराष्ट्र देशा- कोलकाताच्या पोलीस आयुक्तांवरून सीबीआय आणि प. बंगालमधील ममता सरकार यांच्यात जबरदस्त वाद पेटाला असून सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र आधी पोलीस आयुक्तांच्या विरोधातले पुरावे सादर करा मग त्यांना पश्चाताप होईल, अशी कठोर कारवाई करू असे सर्वोच्च न्यायालयाने आज म्हटले आहे.

उद्या सकाळी 10.30 वाजता या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. पश्चिम बंगाल पोलीस तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप करत सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शारदा चिटफंड प्रकरणी कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी सीबीआयचे अधिकारी गेले होते. यावेळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना कोलकाता पोलिसांनी अटक केली आणि रात्री उशिरा त्यांची सुटका केली.