Calcium Deficiency | शरीरामध्ये कॅल्शियमची कमी जाणवत आहे? तर आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Calcium Deficiency : शरीरातील हाडे मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियम खूप महत्त्वाचे असते. शरीरात योग्य प्रमाणात कॅल्शियम असल्यास स्नायू मजबूत राहतात. शरीरातील कॅल्शियमची कमी भरून काढण्यासाठी लोक वेगवेगळ्या औषधांचे सेवन करतात. मात्र, ही औषधे शरीरासाठी घातक करू शकतात. त्यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकतात. शरीरातील कॅल्शियमची कमी भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात पुढील गोष्टींचा समावेश करू शकतात.

बदाम | Almonds for Calcium Deficiency

बदाम हे पोषक तत्वांचे भंडार आहे. बदामामध्ये मुबलक प्रमाणात फायबर, प्रोटीन, कॅल्शियम आणि आयरन आढळून येते. त्यामुळे बदामाचे नियमित सेवन केल्याने स्नायू दुखणे कमी होते. बदाम खाल्ल्याने आरोग्याला देखील अनेक फायदे मिळतात.

मोड आलेले मूग | Deformed Mung Bean for Calcium Deficiency

मोड आलेले मूग आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होते. त्याचबरोबर नियमित मोड आलेल्या मुगाचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहून कॅल्शियमची कमतरता भरून निघू शकते.

अंजीर | Fig for Calcium Deficiency

शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी अंजिराचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. अंजिरामध्ये कॅल्शियम सोबतच फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात आढळून येते. त्यामुळे अंजिराचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात आणि पचन संस्थाही निरोगी राहते.

आवळा | Calcium Deficiency

आवळ्याचे सेवन केल्याने शरीरासोबतच केसांना आणि त्वचेला अनेक फायदे मिळतात. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, कॅल्शियम आयरन आणि ओमेगा 3 आढळून येते. आवळ्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत राहतात आणि शरीर मोसमी आजारांपासून दूर राहते. त्यामुळे आवळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.