fbpx

राफेल प्रकरणावरून पुन्हा संसदेत धुडगूस होण्याची शक्यता, कॅगचा अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्द

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभेमध्ये सतत धुडगूस निर्माण करणाऱ्या राफेल विमान खरेदी बाबतचा अहवाल कॅगनं राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला आहे. राफेल विमान खरेदी प्रकरणावरून विरोधीपक्षाकडून सत्ताधारी पक्षाला वेठीस धरले जात आहे. त्यामुळे राफेलबाबत कॅग कडून तयार करण्यात आलेला अहवाल संसदेसमोर लवकरच मांडला जाणार आहे. त्यामुळे आता राफेल वरून पुन्हा एकदा संसदेत हंगामा होण्याची शक्यता आहे.

कॅग कडून अहवालाची प्रत राष्ट्रपतींना आणि अर्थ मंत्रालयाला पाठवण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयानं राफेलबद्दलचा सविस्तर उत्तर आणि संबंधित अहवाल कॅगला सोपवला होता.कॅगच्या अहवालात राफेल विमान खरेदी बाबतचा सविस्तर आढावा देण्यात आला आहे.

हा अहवाल मोठा असल्याने शिष्टाचारनुसार हा अहवाल प्रथम राष्ट्रपतींकडे सोपवण्यात आला आहे.त्यानंतर हा अहवाल लोकसभा आणि राज्यसभा अध्यक्षांच्या कार्यालयाला पाठवला येईल. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या बुधवारी संपणार आहे. त्यामुळे उद्या किंवा परवा कॅगचा अहवाल लोकसभा आणि राज्यसभेत सादर केला जाऊ शकतो.

1 Comment

Click here to post a comment