fbpx

राफेलसाठी मोदी सरकारने केलेला करार यूपीएपेक्षा 2.86 टक्क्यांनी स्वस्त – कॅग

टीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फ्रान्स सोबत झालेल्या राफेल करारावरून पंतप्रधान मोदींवर टीकेची झोड उठवली आहे. मात्र आज राज्यसभेत सादर करण्यात आलेल्या कॅगच्या रिपोर्टनुसार मोदी सरकारकडून करण्यात आलेला करार हा यूपीएपेक्षा 2.86 टक्क्यांनी स्वस्त असल्याचं सांगण्यात आल आहे. तसेच मोदी सरकारने 126 विमानांच्या तुलनेत 36 विमानांसाठी करार करताना एकूण 17.08 टक्के पैसे वाचवल्याच अहवालात म्हंटले आहे.

२०१६ मध्ये भारतीय सेनेसाठी ३६ लढावू राफेल विमाने खरेदी करण्याचा करार फ्रान्ससोबत करण्यात आला आहे. हा करार करताना मोदी सरकारने अनिल अंबानी यांना फायदा पोहचवल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात येत आहे. कॉंग्रेसच्या सत्ता काळामध्ये देखील 126 विमानांसाठी करार करण्यात आला होता. मात्र तो पुढे बारगळला.

दरम्यान, आज कॅगकडून राज्यसभेत सादर करण्यात अहवालामध्ये मोदी सरकारकडूने केलेल्या राफेल करारामध्ये पैसे वाचल्याचा रिपोर्ट आहे. त्यामुळे एका बाजूला विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. तर भाजपकडून कॉंग्रसचा खोटारडेपणा उघड झाल्याच सांगण्यात येत आहे.

3 Comments

Click here to post a comment