fbpx

केबल आणि डी.टी.एच. वर दूरदर्शनच्या सर्व चोवीस वाहिन्या दाखवा : केंद्र सरकार

टीम महाराष्ट्र देशा- सर्व केबल ऑपरेटर आणि डी टी एच वाहिन्यांनी दूरदर्शनच्या सर्व चोवीस वाहिन्या दाखवाव्यात, असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. केबल चालकांनी दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या दाखवणं कायद्यानं बंधनकारक असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.

लोकसभा आणि राज्यसभा वाहिन्यांबरोबर दूरदर्शनच्या इतर सर्व वाहिन्या आम्ही प्रसारित करतो, अशा आशयाचं प्रतिज्ञापत्र सर्व केबल चालकांनी एका महिन्याच्या आत केंद्र सरकारला सादर करावं, असंही जावडेकर यांनी बजावलं आहे.