Abdul Sattar । दिल्ली : गेल्या दोन दिवसांपूर्वी शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यानंतर पुढे आता हा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते दिल्ली दौऱ्यावर जाणार होते. मात्र फडणवीसांचा अचानक दिल्ली दौरा रद्द झाला. यानंतर या दौऱ्यांमध्ये मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. शिंदेनंतर आता भाजप नेते गिरीश महाजन आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार हे दिल्लीत पोहोचले आहेत.
यावेळी बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले कि, आमचे मित्र अर्जुन खोतकर यांना भेटायला आलो. ३१ तारखेला मुख्यमंत्री सिल्लोडला येत आहेत. त्यावेळी प्रवेश करा हे सांगायला आलो आहे, असं सत्तार म्हणाले. तसेच तीन तारखेच्या आता गॅरींटीने सांगतो मंत्रीमंडळाचा विस्तार होईल. याला कोणतीही कायद्याची अडचण नाही. महाराष्ट्रातील लोकांच्या समस्या कमी व्हाव्यात यासाठी ३ तारखेच्या आत कधीही मंत्रीमंडळ विस्तार होईल. यामध्ये कोणतीही अडचण नाही. कायद्याचीही कोणती अडचण नाही. अशा पद्धतीने त्यांना जर कधी वाटलं तर त्यांना मंत्रीमंडळात घ्यायचं तर ते जरूर घेतील, असं ते म्हणाले.
दरम्यान, दुसरीकडे माध्यमांना गुंगारा देत मुख्यमंत्री शिंदे यांनी बुधवारी पुन्हा दिल्ली गाठली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचवेळा दिल्ली दौरा केला आहे. यावेळीच मुख्यमंत्री शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द झाला असे आधी सांगण्यात आले होते. मात्र बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झाल्याचे माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. रात्री उशिरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मंत्रीमंडळ विस्तार आणि 1 ऑगस्टच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी या दोन्ही मुद्द्यांवर नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते आहे. रात्री साडेतीनच्या सुमारास शिंदे दिल्लीतून मुंबईत परतले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde : माध्यमांना हुलकावणी देत मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर?; रात्री साडेतीन वाजता परतले पुन्हा मुंबईत
- Ajit Pawar : आमच्या सरकारमध्ये पाच नाही, सातजण होते; अजित पवारांनी घेतला फडणवीसांच्या टीकेचा समाचार
- Cabinet expansion | राज्यातील नेत्यांची दिल्ली वारी सुरूच; महाजन, सत्तार घेणार अमित शहांची भेट
- Eknath Shinde : आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनंतर आता एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर
- Ajit Pawar | चहावाला पंतप्रधान, रिक्षावाला मुख्यमंत्री तर टोपलीवालीचा मुलगा… – अजित पवार
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<