Ajit Pawar। मुंबई : राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात येऊन आता जवळपास १ महिना होऊन गेला. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार नाही. यावरून विरोधक वारंवार सरकारवर टीका करत असतात. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्याही सध्या दिल्ली वाऱ्या सुरु आहेत. याआधी अनेकवेळा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाकीत केली जात होती. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार राखडलेलाच आहे. त्यातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार हे यावरून वारंवार सरकारला जाब विचारत आहेत.
अजित पवार म्हणाले कि, लवकरात लवकर मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं पाहिजे. शेतकरी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत दिली पाहिजे. राज्य सरकारने ताबडतोब अधिवेशन बोलावलं पाहिजे. पावसाळी अधिवेशन नेहमी जुलै महिन्यात होतं. पण जुलै झाला. ऑगस्ट आला. तरीही यांना मुहूर्त मिळेना. मंत्रिमंडळ विस्तारासाठी कुठला ग्रीन सिग्नल मिळेना की त्यांच्यात एक वाक्यता होईना? मंत्रिमंडळ विस्तार करायला कशाला घाबरत आहेत हे कळायला मार्ग नाही?, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काल एक महत्वाची माहिती समोर आली आहे. आज आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी 8 ऑगस्टला ठेवली आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे आता सोमवारनंतरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. आता यानंतर पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होण्यास विलंब झाला आहे. तसेच आतापर्यत शिंदे गटातील अनेक नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाकीत केलं होत.
महत्वाच्या बातम्या :
- Shiv Sena । कार्याध्यक्षपदी आदित्य ठाकरे, तर युवासेनेची धुरा तेजस ठाकरेंकडे? शिवसेनेत मोठे फेरबदल होणार?
- Sudhir Mungantiwar | 15 ऑगस्टपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल – सुधीर मुनगंटीवार
- James Anderson : वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन ४०व्या वयातही दाखवतोय युवा खेळाडूंसारखा जोश; पाहा VIDEO!
- Venkatesh Prasad : भारताच्या ‘या’ माजी वेगवान गोलंदाजाचा पाकिस्तानशी नेहमीच राहिला ३६चा आकडा; वाचा!
- Cabinet Expansion । शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा रखडला, हे कारण आलं समोर
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<