जळगाव : राज्यात सत्तांतर होणार असल्याचं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त होऊ शकते, असा दावा केला आहे.
राज्यातील शिंदे सरकार तरणार की कोसळणार? याबाबत सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत मते व्यक्त होत आहेत. शिंदे गट आणि शिंदे सरकारशी संबंधित प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात असल्याने शिंदे सरकारवर टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते एकनाथ खडसे यांनी मत व्यक्त केले आहे. यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये राज्यघटनेतील तरतुदीनुसार दिलेले निर्णय पाहता हे सरकार कोसळू शकते, असे मत खडसे यांनी व्यक्त केल आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Abdul Sattar । लवकरच शिवसेनेचे दहा आमदार शिंदे गटात येणार – अब्दुल सत्तार
- Supriya Sule : सुप्रिया सुळेंच चंद्रकांत पाटलांना खास आमंत्रण; म्हणाल्या,“लवकर घरी जेवायला या, खास बेत करते”
- Abdul Sattar | अर्जुन खोतकर आमच्या सोबत नक्की येणार; अब्दुल सत्तार यांचा मोठा दावा
- Sanjay Raut । थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे ?, संजय राऊतांचा राज्यपालांना संतप्त सवाल
- MNS । गुण्यागोविंदाने इथे राहावं, नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये; मनसेची राज्यपालांना वार्निंग
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<