मराठा आरक्षणासाठी आता मंत्रिमंडळाची उपसमिती

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये पाच सदस्य असणार असून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे अध्यक्ष असणार आहेत. या समितीत शिवसेना नेते दिवाकर रावते आणि एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपचे गिरीश महाजन आणि संभाजी पाटील निलंगेकर यांचा समावेश असणार आहे.

मुंबईती ९ ऑगस्टला झालेल्या मराठा क्रांती मोर्चा वेळी आरक्षणा संदर्भात समन्वय ठेवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मराठा आरक्षणाबाबत समन्वय ठेवण्यासाठी ही समिती संबंधित घटकांशी चर्चा करणार आहे.

You might also like
Comments
Loading...