सीएए आणि एनआरसीमुळे भारतीय मुस्लिमांचे नुकसान नाहीच-मोहन भागवत

गुवाहाटी : कोरोना लाट येण्यापूर्वी दिल्ली येथील शाहीनबाग येथे सीएए आणि एनआरसी या दोन कायद्यांविरोधात मोठे आंदोलन होत होते. त्यातच कोरोना आला आणि हे आंदोलन आणि या कायद्यांवर होणारी चर्चा देखील थांबली. आता मात्र ही चर्चा पुन्हा सुरू होईल असे संकेत दिसत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सीएएविषयी एका कार्यक्रमात बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. देशातील मुस्लिमांचे सीएए अर्थात नागरिकत्व कायद्यामुळे कोणतेही नुकसान होणार नसल्याचे त्यांनी म्हटलेय. ते गुवाहाटी येथे एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. ते म्हणाले, ‘सीएए आणि एनआरसी दोन्ही कायद्यांचा हिंदू-मुस्लिमंमध्ये फूट पडण्याशी काहीही संबंध नाही. त्याभोवती अशा गोष्टींची होणारी चर्चा ही जाणीवपूर्वक राजकीय फायद्यासाठी केली जात आहे’ असे ते म्हणाले.

या पूर्वी ही त्यांनी हिंदू मुस्लीम एक आहे असे वक्तव्य केले होते. त्यावेळी भागवत म्हणाले, ‘पूजा करण्याच्या पद्धतीच्या आधारावर लोकांमध्ये फरक केला जाऊ शकत नाही.’ त्यांनी जमावाद्वारे मारहाण करून हत्येत (लिंचिंग) सहभागी लोकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘असे लोक हिंदुत्वविरोधी आहेत. तथापि, असाही एक काळ होता, जेव्हा काही लोकांविरुद्ध लिंचिंगचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. देशात एकतेशिवाय विकास शक्य नाही. राष्ट्रीयत्व आणि पूर्वजांचा गौरव हा एकतेचा आधार असायला हवा. हिंदू-मुस्लिम यांच्यातील वादांवर चर्चा हाच एकमेव तोडगा आहे, मतभेद नव्हे.’

महत्त्वाच्या बातम्या

IMP