देशातील भाजपच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना मागे टाकत उद्धव ठाकरेंनी मारली बाजी !

udhav Thackeray

मुंबई : ज्यांना प्रशासनाचा अनुभव नाही, निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही आ आरोप ज्यांच्यावर सातत्याने होत असतो त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लोकप्रियतेच्या बाबतीत देशातील सगळ्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांना मागे टाकत देशातील टाॅप पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत जागा मिळवली आहे.

सी व्होटरतर्फे भारतातील प्रसिद्ध नेत्यांबद्दल एक सर्व्हे करण्यात आला. यामध्ये विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचा देखील आढावा घेण्यात आला होता. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पकडून तीन हजार लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं. ज्यामध्ये महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांचा नंबर पाचव्या क्रमांकावर आलाय. महत्त्वाची बाब म्हणजे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय नेता म्हणून उद्धव ठाकरे यांनी गुण मिळवले आहेत. यात विशेष बाब म्हणजे पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये एकही भाजपचा मुख्यमंत्री नाहीये.

ऑक्सिजन अभावी ७ जणांचा मृत्यू, ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयातील घटनेच्या चौकशीची मागणी

दरम्यान, या सर्व्हेमध्ये ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक- ८३ टक्के, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल – ८१ टक्के, केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन – ८० टक्के, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी – ७८ टक्के, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – ७६ टक्के, दिल्लीचे मुख्यामंत्री अरविंद केजरीवाल – ७४ टक्के पसंती मिळाली आहे.

विधानसभा २०१९, एका अशी निवडणूक ज्यांच्या निकालानंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप आला. महाराष्ट्राला जे वाटलं नव्हतं ते सर्वाकाही घडलं. महाविकास आघाडीच्या हातात महाराष्ट्राच्या चाव्या गेल्यात आणि ठाकरे घराण्यातील पहिलीवहिली व्यक्ती मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी ताबा घेतल्यांनंतर उद्धव ठाकरे यांना प्रशासनाचा थेट अनुभव नाही, महाराष्ट्राची जबाबदारी आणि मुख्यत्त्वे विरोधकांचा सामना उद्धव ठाकरे कसा करतात याकडे अनेकांचं लक्ष होतं. मात्र यां सर्व्हेत तरी उद्धव ठाकरे पास झाले आहेत असच चित्र आहे.

निसर्ग वादळ संकटाच्या छाताडावर पाय देऊन पुढे जाऊ – उद्धव ठाकरे