बकरी ईद निमित्त राज्यपालांच्या जनतेला शुभेच्छा

नवी दिल्ली : बकरी ईद निमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. बकरी ईद (ईद उल झुहा) हा पवित्र सण समर्पणभाव, श्रद्धा व त्याग या शाश्वत मूल्यांचे स्मरण देतो. बकरी ईदचा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद, प्रगती व समृद्धी घेऊन येवो, अशी शुभ कामना मी या प्रसंगी करतो, असे विद्यासागर राव म्हणाले.तसेच राज्यातील जनतेला, विशेषतः मुस्लीम बंधू – भगिनींना बकरी ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा असेही ते आपल्या संदेशात म्हणाले आहे.