‘त्या’ महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या लिंगपरिवर्तनासाठी मुख्यमंत्र्याची परवानगी

बीड: शरिरातील हार्मोन्‍समुळे लिंगपरिवर्तन करण्याशिवाय पर्याय नसल्याने बीडमधील महिला पोलीस कॉन्स्टेबलने लिंग बदल करुन पुन्हा सेवेत रुजू करण्याची परवानगी मागितली आहे . आता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवासगी दिल्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी सांगितले आहे.

दरम्यान हे प्रकरण अतिशय दुर्मिळ असल्याने कायदेशीर नियमात तरतूद करुन संबंधित पोलीस कॉन्स्टेबलला पुन्हा सेवेत रुजू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.