गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीला निरोप

पुणे : मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटाने झाले आहे. मंडळाची मिरवणूक सकाळी 10.45 वा. मंडई येथील टिळक पुतळ्यापासून निघाली . मिरवणूकीत सतीश आढाव यांचे नगारावादन न्यु गंधर्व ब्रास बॅन्ड, शिवमुद्रा, ताल आणि शौर्य ढोल ताशा पथक, सिंबायोसिस ईशान्य केंद्राच्या पूर्वोत्तर राज्यातील विद्यार्थ्यांचे लोककला सादरीकरण केले . पालखीतून मिरवणूक निघाली होती.