‘व्हीप’ही येईना भाजपच्या कामाला; 98 पैकी केवळ 66 मतेच सायकल धोरणाला

पुणे: पुणे महापालिकेत भाजप सत्तेवर आल्यापासून पहिल्यांदाच शहराच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या मोठ्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. ते म्हणजे सायकल शेअरिंग प्रकल्प. या प्रकल्पासाठी मंजुरी म्हणजे भाजपमधील एका गटासाठी प्रतिष्ठेचा विषय बनला होता. त्यामुळे शेवटी तब्बल ९८ नगरसेवकांचे संख्याबळ असतानाही मतदानासाठी पक्षाला व्हीप काढावा लागला. मात्र एवढ करूनही प्रत्यक्ष मतदानावेळी झालेला अभूतपूर्व गोंधळ भाजपमधील नाराज गटाच्या पथ्यावर पडला आहे. कारण मतदानाच्या वेळी ८८ भाजप नगरसेवक सभागृहात हजर असतानाही ६६ विरुद्ध ० मतांनीच हा प्रस्ताव मंजूर केला गेला. म्हणजेच व्हीप काढूनही १० नगरसेवक गैरहजर तर उरलेली सभागृहात असणारी २२ मतेही मिळालीच नसल्याच दिसत आहे.

गुरुवारी सायकल शेअरिंग आणि स्वच्छता उपविधी धोरणाला मंजुरी देण्यासाठी खास सभा बोलवण्यात आली होती. सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यावर महापौर मुक्ता टिळक यांनी प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी मतदान पुकारताच प्रकल्पाबाबत बोलण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. आक्रमक झालेल्या विरोधकांनी थेट मानदंड पळवून नेह्न्यापर्यंत गोंधळ घातला. हा गोंधळ सुरु असतानाच महापौरांनी मतदान घेण्याचे आदेश दिले. आणि अशातच ६६ विरुद्ध ० मतांनी सदर प्रस्तावाल मंजुरी मिळाली. दरम्यान आता पक्षाने व्हीप काढूनही केवळ ६६ मतेच मिळाल्याने उरलेली मते कुठे गेली हा प्रश्न निर्माण होत आहे. याबद्दल भाजप नेत्यांना विचारल असता गोंधळामुळे बाकीच्यांना मतदान पुकारल्याचा आवाज गेला नसल्याच सांगत सारवासराव केली जात आहे. मात्र हे सर्व चित्र पाहता भाजपकडून व्हीप बजावूनही पूर्ण मतदान झाले नसल्याने पुन्हा एकदा पक्षांतर्गत असणारा कलह चव्हाट्यावर आल्याच दिसत आहे.

1 Comment

Click here to post a comment