सन 2030 पर्यंत वीजेवर चालणारी वाहने आणणार- डॉ. हर्षवर्धन

राज्य शासनाने पर्यावरन वाचविण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल अभिनंदन करून केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, वीजेवर चालणारी वाहने व त्यासाठीची सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेतला आहे. सन2030 पर्यंत सर्व वाहने ही वीजेवर चालणारी आणण्यासाठी केंद्र शासन प्रयत्न करत आहे. मिशन इनोव्हेशन अंतर्गत केंद्र शासनाने विविध संशोधनावर मोठा भर दिला असून त्यासाठी विविध विद्यापीठे व संस्थांना प्रोत्साहन दिले आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी वीजेवर चालणाऱ्या वाहनांची आवश्यकता आहे. ही वाहने स्वस्त, सहज परवडणारी असून या वाहनांसाठी वीजपुरवठाही सुलभपणे करण्यात येणार आहे.

पर्यावरण वाचविण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघ व केंद्र शासन मोहीम राबवित असून सर्वांनी पर्यावरण वाचविणे हे आपले नैतिक कर्तव्य मानून यामध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन डॉ. हर्षवर्धन यांनी केले.