दुपारपर्यंत राज्यात सरासरी ३५ टक्के मतदान, कोल्हापुरात सर्वाधिक ४२ तर पुण्यात २७ टक्के

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे, सकाळी उत्साहात सुरू झालेल्या मतदानाला दुपारपर्यंत काहीसा ब्रेक लागल्याचं दिसत आहे. दुपारी १ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीनुसार राज्यात सर्वाधिक 42 टक्के मतदान कोल्हापूरमध्ये पार पडले आहे. तर पुण्यात केवळ २७ टक्केच मतदान झाले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे, महाराष्ट्रातील १४ जागांसह देशातील ११७ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. आपला लोकप्रतिनिधी निवडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान करून आपला लोकप्रतिनिधी निवडावा असे आवाहन निवडणूक आयोगाकडून गेले अनेक दिवस केले जात आहे. काही ठिकाणी या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे, तर काही ठिकाणी मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याच दिसत आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात उन्हामुळे मतदारांचा ओघ कमी झाला आहे. पुण्यात १ वाजेपर्यंत २७ टक्के मतदान झाले आहे. दुपारी ४ च्या पुढे पुण्यातील आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूरमध्ये ४२ टक्के सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांंनी मतदानाला आतापर्यंत भरगोस प्रतिसाद दिला आहे.

राज्यातील दुपारी 1 पर्यंतचे मतदान

कोल्हापूर – 42 %
हातकणंगले – 40 %
सांगली – 34 %
सातारा – 43 %
माढा 33 %
पुणे – 27 %
बारामती – 35 %
अहमदनगर – 34 %
जळगाव – – 33 %
रावेर – 35 %
जालना – 37 %
औरंगाबाद – 35 %
रायगड – 38 %
रत्नागिरी – सिंधुदुर्ग – 39 %Loading…
Loading...