विधानसभा पोटनिवडणूक निकाल : पलुस – कडेगावमधून विश्वजित कदम विजयी

blank

सांगली : देशातील १० विधानसभेच्या जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल यायला सुरुवात झाली असून, आमदार पंतगराव कदम यांचं निधन झाल्याने रिक्त झालेल्या सांगलीतील पलुस-कडेगाव या जागेवर त्यांचे पुत्र विश्वजित कदम हे बिनविरोध निवडून आले आहेत.

सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूकीत काँग्रेसकडून पतंगराव कदम यांचे सुपुत्र विश्वजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली होती.

विश्वजित कदम यांच्या विरोधात भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी ऐनवेळेस माघार घेतल्याने कदम यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला होता. आज त्याची औपचारिक घोषणा करण्यात आली.