लोकसभा, विधानसभा पोटनिवडणूक; पालघरमध्ये कमळ फुललं, मात्र देशभरात भाजपची पीछेहाट

lingayat-pontiffs-support-siddaramaiah-biggest-setback-for-bjp

नवी दिल्लीः लोकसभेच्या चार आणि विविध राज्यांतील विधानसभांच्या १० मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. त्यापैकी पालघरमध्ये जरी भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित विजयी झाले असले. तरी देखील देशतील इतर ठिकाणी मात्र भाजपला पराभवाचा सामना करावा लागलाय.

भंडारा-गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे हे निर्णायक आघाडीकडे वाटचाल करताना दिसून येत आहेत. तर भाजपाचे हेमंत पटले पिछाडीवर आहेत. उत्तर प्रदेशातील नूरपूरमध्ये समाजवादी पार्टीचा उमेदवार विजयी झालाय. शाहकोट पंजाबमध्ये काँग्रेसचा विजय, जोकीहाट बिहारमध्ये – राष्ट्रीय जनता दल विजयी, झारखंडमधील गोमिया मतदार संघात झारखंड मुक्ती मोर्चाचा उमेदवार विजयी झालाय. केरळमधील चेनगन्नूरात माकपा विजयी, तर कर्नाटकातील राजराजेश्वरी नगरमध्ये भाजपला मात देत काँग्रेसने बाजी मारली आहे. अद्याप काही निवडणुकांचे निकाल हाती येणे बाकी आहेत.