पोटनिवडणूक निकाल : बिजनौरमध्ये भाजपला धक्का देत सपाची बाजी

बिजनौर : उत्तर प्रदेशच्या बिजनौरमधील नुरपूर विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. समाजवादी पार्टीच्या नईमुल हसन यांनी भाजपच्या अवनि सिंह यांना 6688 मतांनी पराभव केला आहे.

भाजप आमदार लोकेंद्र सिंह यांच्या निधनानंतर नुरपूर मतदारसंघ रिक्त झाला होता. लोकसभा मतदारसंघातून भाजपने लोकेंद्र सिंहांच्या पत्नी अवनी सिंह यांना उमेदवारी दिली होती. तर सपाकडून ही निवडणुक नईमुल हसन लढत होते. दरम्यान आतापर्यंत 14 पैकी 12 जागांचे अंतिम निकाल जाहीर झाले असून, यापैकी केवळ 2 जागांवर भाजपला विजय मिळवता आला आहे.