आता ‘बाय वन, गेट वन फ्री’ ऑफर बंद

GST

 

वेबटीम:- ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकदार एकावर एक अशी ऑफर देत असतात. मात्र, आता ही ऑफर बंद होणार आहे. वस्तू आणि सेवाकर म्हणजेच जीएसटी लागू झाल्यापासून कंपन्यांनी एकावर एक फ्री ऑफरला कात्री लावली आहे. १ जुलैपासून लागू झालेल्या जीएसटीमुळे पैकेज प्रॉडक्ट्स आणि फूड सर्विसेजच्या बऱ्याच कंपन्यांनी या ऑफर्स बंद केल्या आहेत.

जर कंपन्यांनी कोणतीही वस्तू गिऱ्हाईकांना फ्री दिली तर त्या कंपनीला जीएसटीअंतर्गत अतिरिक्त टॅक्स द्यावा लागणार आहे. तसेच काही प्रॉडक्टची मोफत विक्री केली तर त्यावर मिळणारे इनपूट क्रेडिट मिळणार नाही. या कारणामुळे कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकावर एक फ्री ऑफर देऊ शकणार नाहीत. बाय वन, गेट वन फ्री ही ऑफर आम्ही आता बंद करीत आहोत, असे देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या पारले बिस्किट कंपनी प्रॉडक्ट्सचे मार्केटिंग हेड मयंक शहा यांनी सांगितले.

डॉमिनोज पिज्जा, डंकिन डोनट्स आणि रेस्टॉरंट सुद्धा ‘बाय वन, गेट वन फ्री’ ऑफर बंद करीत आहेत. जीएसटीनुसार फूड सर्विसेजमध्ये विकल्या गेलेल्या प्रत्येक पॉडक्टची एक किंमत असणे गरजेचे आहे. या कारणामुळे आम्ही ही ऑफर बंद करीत आहोत, असे व्यावसायिकांनी सांगितले. जर कंपन्यांनी कोणतीही वस्तू मोफत दिली तर कंपनीला त्यावर जीएसटी द्यावा लागेल, त्यामुळे आता बाय वन गेट वन फ़्री चे फलक दिसणार नाहीत.