मुंबई: लष्कराच्या पाठिंब्यावर इम्रान खान (Pakistan Prime Minister Imran Khan) यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची खुर्ची आजवर कशीबशी टिकवल. मात्र , रेकॉर्डब्रेक महागाईमुळे पाकिस्तानी जनतेमध्ये जो प्रचंड असंतोष पसरला आहे, त्याला इम्रान खान कसे सामोरे जाणार? महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव आणि पाकिस्तानी जनतेचा सोशल मीडियावर उमटणारा आक्रोश यामुळे इम्रान खान मेटाकुटीस आले आहेत. त्यात “आलू , टमाटय़ाचे भाव बघण्यासाठी मी पाकिस्तानचा पंतप्रधान झालो नाही”, असे बेजबाबदार विधान करून इम्रान यांनी आपल्या विरोधातील वणव्यात तेल ओतण्याचेच काम केले आहे. असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून म्हटले आहे.
विरोधी पक्षांनी पाकिस्तानी संसदेत आणलेल्या अविश्वास प्रस्तावात इम्रान यांच्या संतापाचे मूळ दडले आहे. जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न विरोधी पक्षात असताना अकांडतांडव करत मांडायचे, महागाईसारख्या जनतेला अपील होणाऱ्या मुद्द्यांवर देशभर रान माजवून सरकारला धारेवर धरायचे हा तसा जगभरातील राजकारणाचा रिवाजच आहे. पाकिस्तानातील विरोधी पक्ष आज तेच काम करतो आहे . इम्रान यांनीही क्रिकेटच्या मैदानातून राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर तेच केले होते . मात्र , सत्तेत आल्यानंतर महागाईला लगाम घालण्यात इम्रान खान कमालीचे अपयशी ठरले. उलट इम्रान यांच्या राजवटीत पाकिस्तानातील जनतेची अन्नान्न दशा झाली, दारिद्रय़ वाढले, बेरोजगारी वाढली, तिजोरीत खडखडाट झाला. पाकिस्तान आकंठ कर्जात बुडाला. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे व अमेरिका, चीन, आखाती देशांकडे भिकेचा कटोरा घेऊन इम्रान खान गेले अनेक महिने फिरत आहेत. अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.
‘मदतीसाठी टाहो फोडणारा याचक देश’ अशी पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा तयार झाली. सगळ्या देशांच्या उधाऱ्यापाधाऱ्या थकल्यानंतर आता पाकिस्तान रशियाच्या मागेपुढे शेपूट हलविताना दिसतो आहे. जर्जर झालेल्या पाकिस्तानचे हे चित्र तेथील जनतेलाही अस्वस्थ करून सोडत आहे. त्यामुळेच विरोधी पक्षांनी महागाईच्या मुद्द्यावर इम्रान खान यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावाला संसदेत राजकीय उत्तर देण्याची संधी असतानाही इम्रान खान यांनी एका जाहीर सभेत “आलू , टमाटय़ाचे भाव बघण्यासाठी मी पंतप्रधान झालो नाही” , असे विधान करून महागाईच्या आगीत स्वतःच तेल ओतले आहे. असे संजय राऊत म्हणाले आहेत.
धनशक्तीच्या जोरावर माझे सरकार पाडण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत आहेत, पण शाहबाज शरीफ, आसिफ अली जरदारी आणि मौलाना फजलूर रहमान या तीन विरोधी पक्षनेत्यांच्या विकेट मी एकाच इनस्विंग यॉर्करवर घेईन असा दावा इम्रान यांनी केला आहे. आपली खुर्ची बळकट आहे हे दाखविण्यासाठी इम्रान असा दावा करत असले तरी त्यांच्या ‘तेहरिक ए इन्साफ’ या पक्षातच इम्रान यांच्याविरुद्ध असंतोष वाढताना दिसतो आहे . लष्कराच्या पाठिंब्यावर इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची खुर्ची आजवर कशीबशी टिकवली . मात्र, रेकॉर्डब्रेक महागाईमुळे पाकिस्तानी जनतेमध्ये जो प्रचंड असंतोष पसरला आहे, त्याला इम्रान खान कसे सामोरे जाणार? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
-
IND vs SL : लंकेचा धुव्वा उडवत भारताचा मालिका विजय; रचला नवीन इतिहास!
- पोलीस दलात होणार भरती; गृहमंत्र्यांची मोठी घोषणा
- मी FBI काढली Fadnavis Bureau of Investigation; फडणवीसांचा गृहमंत्र्यांना टोला
- ‘या’ महिन्यात सोयाबीनला मिळाला दर्जेदार भाव; पहा आजचे दर..
- रावसाहेब दानवेंच्या फोटोला जोडे मारत नाभिक समाजाचे तीव्र आंदोलन
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<